Sunday, May 8, 2011

आमचे सोनारकाका

दोस्त,
आज सकाळी ब्लोगवर लिहिलेला मजकूर माझा नाही तर मला आलेल्या पत्रातील आहे.असो सांगायचे असे कि तुम्हाला आठवत असेल मी वाशीमला रेंलवे कॉलोनीत राहत असे.बाकलीवाल शाळेत माझे तेथील काही सवंगडी होते. काही आपल्या पुढे काही मागे.आपल्या १ वर्ष मागे असणाऱ्या मध्ये विवेक बापट ,सुहास बाळापुरे ,नाना जाधव असे काही जण विशेष आठवतात कारण अद्यापहि संपर्क आहे.
क्रिकेट खेळणारा बापट आठवतो तो त्याच्या जोरकस बोलिंग मुळे.सुमारे २ वर्षापूर्वी अचानक हृदयविकारामुळे अकाली गेला.आयुष्यात स्थिर होण्यासाठी जे-जे काही करावे लागते ते-ते सर्व त्याने केले पण एका मर्यादेनंतर काही करणेच सोडून
'ठेविले अनंते तैसेची राहावे 'ह्या उक्तीनुसार अविवाहित आयुष्य जगाला अवघ्या ४३व्या वर्षी गेला.
आज हे सर्व आठवायचे कारण ???
७/८ दिवसापूर्वी दुपारी  गाडीवरून गाडीवरून जात असता नानाचा फोन आला .आवाजात जाणवण्याइतका हळवेपणा होता.पहिले तर त्याने माझ्या वडिलांची चौकशी केली मला काही कळेना .मग हळूच स्वत:च्या वडिलांच्या निधनाची वार्ता सांगता झाला. 
ती संध्याकाळ -रात्र मला भूतकाळात घेऊन गेली .रेल्वे कॉलनी चे दिवस आठवायला लागले .आमची कॉलनी म्हणजे एक कुटुंबच होते.रुसवे-फुगवे जरी होते तरी माणस आपली वाटायची.वडिलान इतकाच  धाकही असे.प्रेमळ तितकीच!गेल्या २५ वर्षात माझ्या सौ आईला अनंतचतुर्दशीला तिच्या वाढदिवसाला काकांचा फोन आला नाही असे झाले नाही.ते आईला 'चांदोबा' म्हणत !
नाना कडे मी नेहमी पुस्तके वाचण्यासाठी जात असे कारण मला असणारे वाचनाचे वेड.काकादेखील कधी नाही म्हणाले नाहीत अगदी परीक्षेच्या काळातसुद्धा.आज काका वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या सर्व जबाबदारया पूर्ण करून पूर्णत्वास गेले.काकू गतवर्षी नातीचे लग्न पाहून १५च दिवसात गेल्या त्यानंतर काका थोडे चीड्चीडे झाले होते पण काकांच्या दोन्ही अकोल्यात असणारया सुनांनी कुठलीच खळखळ न करता सर्व केले.मला तर आता या सर्वाची उणीव जाणवणार.काकांच्या जाण्याने जी पोकळी नाना,राजूदादा,बापू ह्या त्यांच्या मुलांच्या आयुष्यात निर्माण झाली आहे त्याबद्दल काय लिहू ?
तरुण भारतचे संपादक मा.गो.वैद्य एका ठिकाणी लिहितात,
मरण मोठे भाग्य आहे त्याला घाबरू नये.योग्य वेळी त्याच्या स्वागतासाठी आपण सिद्ध असले पाहिजे.मरण म्हणजे एक विरह असतो हे खरे त्यामुळे आपल्या माणसाचा मृत्यू झाला तर वाईट वाटणे स्वाभाविक पण दु:ख बाजूला सारून जीवनाचा आनंद घ्यायला सिद्ध होणे हि आपली परंपरा आहे.मरणाची हि सुंदर कल्पना फक्त भारतीय संस्कृतीतच आहे.
---आमचे सोनारकाका

No comments: