Monday, December 5, 2011

from fb wall of nirmala agrawal

निर्मला
तुझ्या यादीतनिर्मला तुझ्या यादीत माझे नाव पाहून बरे वाटले.
अशोक हेदा  सध्या निवडणुकीत व्यस्त आहे .  .आसो तुझी कन्या कशी आहे .तिच्या विवाहाचे योग कळव.आम्ही २८ जणांनी भिसी सुरु केली आहे .अकोला येथील   विनोद उखाळकर    औरंगाबादचा संतोष मालपाणी आणि मी असे ३ जन बाहेरगावचे आहोत .तेवढेच परत परत भेटीचे योग .
माझ्या वडिलांच्या निधनानंतर तुझा तसेच जयश्रीचा पण फोन आला होता .

Saturday, October 29, 2011

'diwali pahat'


http://www.facebook.com/photo.php?fbid=300673513277489&set=a.156280621050113.33728.100000045293199&type=3
Friends,

last 7 years i myself in association with dr nandkumar mulmule ,leading psychiatric from nanded organising this program.this time we have organised it in a very different manner  being a man behind event management every thing was planned within 5 days by us.

Sunday, August 21, 2011

देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा!

yes
प्रिय मित्रवर चंदू,राजू लाहोटी , नंदू परळकर ,बाबाराव राठोड ,दिलीप सोनी यास 
माझ्या वडीलांच्या मृत्युनंतर तुम्ही सर्व जण खास आपल्या १० वीतल्या मित्राला भेटण्यास वाशिमहून कारने आलात फारतर ३० मिनटे असाल पण तुमच्या भेटीने मनाला फार शांत वाटले .याच दिवसात निर्मला,जयश्री ,भेलोंडे ,अशोक हेदा   असे अनेकांचे फोन आले.सर्वांचेच शोकसंदेश मिळाले त्या पार्श्वभूमीवर हे मनोगत !
                                   देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा!
कवीने व्यक्त केलेली हि भावना थोड्याफार फरकाने आपण सर्वजण अनुभवत आलो आहोत.
तथापि बाबांनी देह सोडला त्याविषयी आपल्या भावना निश्चितच वेगळ्या आहेत.त्या कदाचित शब्दात व्यक्त करता येणार नाहीत पण जाणवल्या हे नक्की.
१/८/२०११,श्रावण शु.व्दितीया सोमवार पहाटेच्या रामप्रहरी केव्हातरी शांत आणि तृप्त मनाने घेतलेला जगाचा निरोप सारेच कसे विलोभनीय .
बाबांची योग्यता,त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबध त्यांचा आश्वासक सहवास ह्या सर्वांचा  वियोग क्लेशदायकच पण तुम्हा  सर्वांच्या उपस्थितीने/शब्दाने  आमच्या परिवाराचा  दु:खभार निश्चितच हलका झाला.आमच्या जीवनपथावरील वाटचालीत बाबांचे आशीर्वाद ,तुम्हा लोकांचे कृपाछत्र आमच्यासाठी मोठेच पाथेय  ऋण निर्देश नाही तर  आपली मायपाखर अशीच रहावी ह्या आर्तभावनेने हे चार शब्द!

                                                                                       मधुकर शृंगारपुरे 
 
 
अभय  शृंगारपुरे 

Tuesday, July 5, 2011

संमिश्र महिना

मित्रहो गेला जून महिना काहीच लिहिता आले नाही कारण घरातील कामे,पाहुणे यात वेळ कसा जात होता काही कळतच नव्हते अर्थात मोबाईल वर संदेश पाठवणे चालू होतेच.
जून महिना तसा संमिश्र राहिला आपल्यातील काही जणांची मुले १०/१२ ला होती पैकी ३चे निकाल मला कळू शकले.
अ]शताक्षी पुरानकर हि शंतनू पुरानकरची मुलगी १०वित ९४% गुण घेऊन उत्तीर्ण झाली.शंतनू पुरानकर औरंगाबाद येथे आहे
ब]सुरेश खरावणचा मुलगादेखील १०वित ९४% गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे
क]नांदेड येथील आपला मित्र राजेश पटणीचा मुलगा रौनक १२ वीत उत्तीर्ण झाला असून AIEEE मध्ये २८४५ क्रमांक मिळवला आहे
या सर्व यशवंत पाल्यांचे अभिनंदन !
याच महिन्यात दोन दु:खद बातम्या पण समजल्या आहेत
१]आपला मित्र भालचंद्र भेलोंडे,कारंजा 
 २]आणि चंदू देशमुख ह्या दोहोंचे वडिलांचे छत्र हरवले.
वाढत्या वयानुसार दोघांच्याही वडिलांची वये झाली होती पण वडिलांचा आधार काही वेगळाच असतो .ह्या पोकळीतून बाहेर येण्याची ताकद तो 
ईश्वर त्यांना देवो हि प्रार्थना ! 
 ---इति लेखनसीमा !

Sunday, May 8, 2011

आमचे सोनारकाका

दोस्त,
आज सकाळी ब्लोगवर लिहिलेला मजकूर माझा नाही तर मला आलेल्या पत्रातील आहे.असो सांगायचे असे कि तुम्हाला आठवत असेल मी वाशीमला रेंलवे कॉलोनीत राहत असे.बाकलीवाल शाळेत माझे तेथील काही सवंगडी होते. काही आपल्या पुढे काही मागे.आपल्या १ वर्ष मागे असणाऱ्या मध्ये विवेक बापट ,सुहास बाळापुरे ,नाना जाधव असे काही जण विशेष आठवतात कारण अद्यापहि संपर्क आहे.
क्रिकेट खेळणारा बापट आठवतो तो त्याच्या जोरकस बोलिंग मुळे.सुमारे २ वर्षापूर्वी अचानक हृदयविकारामुळे अकाली गेला.आयुष्यात स्थिर होण्यासाठी जे-जे काही करावे लागते ते-ते सर्व त्याने केले पण एका मर्यादेनंतर काही करणेच सोडून
'ठेविले अनंते तैसेची राहावे 'ह्या उक्तीनुसार अविवाहित आयुष्य जगाला अवघ्या ४३व्या वर्षी गेला.
आज हे सर्व आठवायचे कारण ???
७/८ दिवसापूर्वी दुपारी  गाडीवरून गाडीवरून जात असता नानाचा फोन आला .आवाजात जाणवण्याइतका हळवेपणा होता.पहिले तर त्याने माझ्या वडिलांची चौकशी केली मला काही कळेना .मग हळूच स्वत:च्या वडिलांच्या निधनाची वार्ता सांगता झाला. 
ती संध्याकाळ -रात्र मला भूतकाळात घेऊन गेली .रेल्वे कॉलनी चे दिवस आठवायला लागले .आमची कॉलनी म्हणजे एक कुटुंबच होते.रुसवे-फुगवे जरी होते तरी माणस आपली वाटायची.वडिलान इतकाच  धाकही असे.प्रेमळ तितकीच!गेल्या २५ वर्षात माझ्या सौ आईला अनंतचतुर्दशीला तिच्या वाढदिवसाला काकांचा फोन आला नाही असे झाले नाही.ते आईला 'चांदोबा' म्हणत !
नाना कडे मी नेहमी पुस्तके वाचण्यासाठी जात असे कारण मला असणारे वाचनाचे वेड.काकादेखील कधी नाही म्हणाले नाहीत अगदी परीक्षेच्या काळातसुद्धा.आज काका वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या सर्व जबाबदारया पूर्ण करून पूर्णत्वास गेले.काकू गतवर्षी नातीचे लग्न पाहून १५च दिवसात गेल्या त्यानंतर काका थोडे चीड्चीडे झाले होते पण काकांच्या दोन्ही अकोल्यात असणारया सुनांनी कुठलीच खळखळ न करता सर्व केले.मला तर आता या सर्वाची उणीव जाणवणार.काकांच्या जाण्याने जी पोकळी नाना,राजूदादा,बापू ह्या त्यांच्या मुलांच्या आयुष्यात निर्माण झाली आहे त्याबद्दल काय लिहू ?
तरुण भारतचे संपादक मा.गो.वैद्य एका ठिकाणी लिहितात,
मरण मोठे भाग्य आहे त्याला घाबरू नये.योग्य वेळी त्याच्या स्वागतासाठी आपण सिद्ध असले पाहिजे.मरण म्हणजे एक विरह असतो हे खरे त्यामुळे आपल्या माणसाचा मृत्यू झाला तर वाईट वाटणे स्वाभाविक पण दु:ख बाजूला सारून जीवनाचा आनंद घ्यायला सिद्ध होणे हि आपली परंपरा आहे.मरणाची हि सुंदर कल्पना फक्त भारतीय संस्कृतीतच आहे.
---आमचे सोनारकाका

Wednesday, May 4, 2011

आयुष्यफारसुंदर आहे!..

yesएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो.
मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो
खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.
----क्रमशः;1

Sunday, April 24, 2011

साप्ताहिकी

मित्रहो,
गेल्या काही दिवसांपासून मी छोटासा लेखन प्रपंच करीत आहे त्यास प्रतिसादही चांगला आहे.गेल्या चार-पाच दिवसात आपले बालमित्र अवस्थी, संतोष सोमाणी ,सुनील झान्झरी, संजीव नान्दगावकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले.राजू जरा घाईत होता त्याच्या नवीन महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने बैठक बोलविली होती.नंतर सविस्तर बोलू असे म्हणत तब्बल दहा मिनिट तरी बोलला.संतोष तसा निवांत होता चहा पितो आहे, काय नवीन विशेष?असे विचारत संवाद सुरु केला !संजीवला फोन केला तेव्हा त्याने उत्तरच दिले नाही. कामात असेल नंतर बघू असा विचार करून मी फोन बंद केला तर आज सकाळी त्याचा फोन.छान गप्पा केल्या .चंदू देशमुखच्या तब्येतीबद्दल समजले काळजीचे कारण नाही.संजीवचा मुलगा बी ई अंतिम वर्षाला आहे एका चांगल्या संगणक कंपनीत नोकरी पण मिळाली आहे.कंपनीचे नाव कोग्निझांत[conignant ] त्याच्या सुयाशात आपण सहभागी होऊ या .आशोक हेडाच्या मुलीचे लग्न जून मध्ये आहे असे संतोष कडून समजले.आपण सर्व लग्नात भेटूयात!
--लेखनसीमा ---

ti

Sunday, April 17, 2011

फोटो परत एकदा !

मित्रांनो ,काही दिवसापूर्वी टीकाइत चा फोन आला होता फोटो पाहता येत नाही ! लक्ष्यात असे आले कि मराठी लिहिण्याची सोय करून घेतल्यामुळे हि अडचण निर्माण झाली आहे .त्यामुळे परत एकदा आठवतील तसे काही फोटो उपलोड करत आहे.
आपला ब्लोग बरेच जण वाचतात पण प्रतिक्रिया का देत नाहीत ? तुमच्या नोंदी महत्वाच्या आहेत. आपल्या मित्रांबद्दल काही नवीन समजले तर कळवत चला.


































yes

Saturday, April 9, 2011

काही विशेष

मित्रांनो,
चैत्र शुद्ध प्रतिपदा आर्थात ४/४/२०११ या दिवशी माझे उदर-भारानाचे साधन अर्थात दुकान नवीन जागेत सुरु झाले !तो दिवस काही छोट्या गोष्टीमुळे मला लक्ष्यात राहील असा ठरला !आतापर्यंत मी कधी समारंभात जाताना बुके घेऊन जात नसे !मला तो पैसा वाया घालवण्याचा प्रकार वाटे पण त्या दिवशी मला मिळालेल्या पुष्पगुच्चान्मुळे जाणवले कि हि किती सुंदर कल्पना आहे! 
   असो दुसरे असे कि आपला मित्र राजेंद्र अवस्थी रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात दिनांक ६ एप्रिल २०११ पासून प्राचार्यपदी रुजू झाला आहे सदर महाविद्यालय जय्क्रांती शिक्षण प्रसारक मंडळ ,लातूर या संस्थेचे आहे.याआधी तो जालना येथे ७ वर्ष बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात प्राचार्य होता.दिनांक ८ एप्रिल च्या दैनिक सामनात पान ७ वर बातमी आहे.
त्याचे  अभिनंदन !
मित्र प्रवीण कौन्धिन्या च्या मुलीचे लग्न दिनांक ३ जून ला आहे सासरा झाल्याबद्दल त्याचेही अभिनंदन !


Saturday, April 2, 2011

मानसी मेडिकल स्थलांतर सोहळा

मानसी मेडिकल स्थलांतर सोहळा. कार्यक्रमाची पत्रिका.

Tuesday, March 8, 2011

लोणार सरोवर


लोणार सरोवर

साभार- साप्ताहिक विवेक
 

Saturday, March 5, 2011

नांदेड -भूकंप

मित्रानो
मी काल लिहिल्या प्रमाणे दिनांक २ ला महाशिवरात्री च्या रात्री ३.३१ च्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का जाणवला त्या नंतर आजपर्यंत ९३ छोटे-मोठे धक्के बसले आहेत.रात्री जाणवलेला ३.१७ तीव्रतेचा धक्का गेल्या ५ वर्षातील सर्वात मोठा धक्का होता दिवसे-दिवस भूकंपाचे प्रमाण वाढतच चालले आहे प्रशासन मात्र बेफिकीर आहे.कालच गोपाल अग्रवालचा message मिळाला तो लिहितो "आम्ही तुझ्या काळजीत सामील आहो"
वाचून फार बरे वाटले
ब्लोग लिहावयास सुरु केल्यापासून बरयाच जणांनी ब्लोग पाहिल्याचे लक्ष्यात आले .आतापर्यंत आपला हा ब्लोग ५१० वेळा पहिल्या गेला आहे विशेषत: जपान,मलेशिया, अमेरिका मधून देखील कोणीतरी ब्लोगवर भेट देत आहे.

Friday, March 4, 2011

its terrible!

friends,
we nanded people had gone through terrible experience once again.on 3rd march midnight at 3.31am we have experienced earthquake of 3.17 rishter scale.higher to that of its previous years.since from last 4 years earthquake is common in our life.but 3rd march is different one.in 15 hours its around 51 times that we have gone through this journey.but its our fortune that no dammage done in the city.
thanks to lord shiva.

Sunday, February 13, 2011











Friends,
hope all of you will enjoy all these photos & once again gather u r schooldays memories.In six parts i have uploaded total 50 photographs from 146 that i am holding in my digital camera.Tried to cover our maximum friends who came at lonar for gathering.I am actually waiting for c.d that we have recorded for complete function.
Friends try to be in touch with each other by sms at leeast.Just before a week back i got 2 very good sms from harish.I have forwarded one to my some relatives at late night and surpries to note 5 relatives immediately dialed my number & talk with me .See this is the strength of good sms.
I am receiving messages from kamalakar,bhagwat,raju thakur Just 2 days back i had a detailed talk with nirmala agrawal.She is now busy in searching good match for her daughter.
snjiv nandgaonkar celebrating his marriage anniversary!
see u soon! bye!i am going to Tirupathy after a long gap.......after 20 years!and first time with my spouse.