Sunday, August 21, 2011

देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा!

yes
प्रिय मित्रवर चंदू,राजू लाहोटी , नंदू परळकर ,बाबाराव राठोड ,दिलीप सोनी यास 
माझ्या वडीलांच्या मृत्युनंतर तुम्ही सर्व जण खास आपल्या १० वीतल्या मित्राला भेटण्यास वाशिमहून कारने आलात फारतर ३० मिनटे असाल पण तुमच्या भेटीने मनाला फार शांत वाटले .याच दिवसात निर्मला,जयश्री ,भेलोंडे ,अशोक हेदा   असे अनेकांचे फोन आले.सर्वांचेच शोकसंदेश मिळाले त्या पार्श्वभूमीवर हे मनोगत !
                                   देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा!
कवीने व्यक्त केलेली हि भावना थोड्याफार फरकाने आपण सर्वजण अनुभवत आलो आहोत.
तथापि बाबांनी देह सोडला त्याविषयी आपल्या भावना निश्चितच वेगळ्या आहेत.त्या कदाचित शब्दात व्यक्त करता येणार नाहीत पण जाणवल्या हे नक्की.
१/८/२०११,श्रावण शु.व्दितीया सोमवार पहाटेच्या रामप्रहरी केव्हातरी शांत आणि तृप्त मनाने घेतलेला जगाचा निरोप सारेच कसे विलोभनीय .
बाबांची योग्यता,त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबध त्यांचा आश्वासक सहवास ह्या सर्वांचा  वियोग क्लेशदायकच पण तुम्हा  सर्वांच्या उपस्थितीने/शब्दाने  आमच्या परिवाराचा  दु:खभार निश्चितच हलका झाला.आमच्या जीवनपथावरील वाटचालीत बाबांचे आशीर्वाद ,तुम्हा लोकांचे कृपाछत्र आमच्यासाठी मोठेच पाथेय  ऋण निर्देश नाही तर  आपली मायपाखर अशीच रहावी ह्या आर्तभावनेने हे चार शब्द!

                                                                                       मधुकर शृंगारपुरे 
 
 
अभय  शृंगारपुरे