Friday, May 27, 2011

कौन्डीन्ये च्या ज्येष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण.

Sunday, May 8, 2011

आमचे सोनारकाका

दोस्त,
आज सकाळी ब्लोगवर लिहिलेला मजकूर माझा नाही तर मला आलेल्या पत्रातील आहे.असो सांगायचे असे कि तुम्हाला आठवत असेल मी वाशीमला रेंलवे कॉलोनीत राहत असे.बाकलीवाल शाळेत माझे तेथील काही सवंगडी होते. काही आपल्या पुढे काही मागे.आपल्या १ वर्ष मागे असणाऱ्या मध्ये विवेक बापट ,सुहास बाळापुरे ,नाना जाधव असे काही जण विशेष आठवतात कारण अद्यापहि संपर्क आहे.
क्रिकेट खेळणारा बापट आठवतो तो त्याच्या जोरकस बोलिंग मुळे.सुमारे २ वर्षापूर्वी अचानक हृदयविकारामुळे अकाली गेला.आयुष्यात स्थिर होण्यासाठी जे-जे काही करावे लागते ते-ते सर्व त्याने केले पण एका मर्यादेनंतर काही करणेच सोडून
'ठेविले अनंते तैसेची राहावे 'ह्या उक्तीनुसार अविवाहित आयुष्य जगाला अवघ्या ४३व्या वर्षी गेला.
आज हे सर्व आठवायचे कारण ???
७/८ दिवसापूर्वी दुपारी  गाडीवरून गाडीवरून जात असता नानाचा फोन आला .आवाजात जाणवण्याइतका हळवेपणा होता.पहिले तर त्याने माझ्या वडिलांची चौकशी केली मला काही कळेना .मग हळूच स्वत:च्या वडिलांच्या निधनाची वार्ता सांगता झाला. 
ती संध्याकाळ -रात्र मला भूतकाळात घेऊन गेली .रेल्वे कॉलनी चे दिवस आठवायला लागले .आमची कॉलनी म्हणजे एक कुटुंबच होते.रुसवे-फुगवे जरी होते तरी माणस आपली वाटायची.वडिलान इतकाच  धाकही असे.प्रेमळ तितकीच!गेल्या २५ वर्षात माझ्या सौ आईला अनंतचतुर्दशीला तिच्या वाढदिवसाला काकांचा फोन आला नाही असे झाले नाही.ते आईला 'चांदोबा' म्हणत !
नाना कडे मी नेहमी पुस्तके वाचण्यासाठी जात असे कारण मला असणारे वाचनाचे वेड.काकादेखील कधी नाही म्हणाले नाहीत अगदी परीक्षेच्या काळातसुद्धा.आज काका वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या सर्व जबाबदारया पूर्ण करून पूर्णत्वास गेले.काकू गतवर्षी नातीचे लग्न पाहून १५च दिवसात गेल्या त्यानंतर काका थोडे चीड्चीडे झाले होते पण काकांच्या दोन्ही अकोल्यात असणारया सुनांनी कुठलीच खळखळ न करता सर्व केले.मला तर आता या सर्वाची उणीव जाणवणार.काकांच्या जाण्याने जी पोकळी नाना,राजूदादा,बापू ह्या त्यांच्या मुलांच्या आयुष्यात निर्माण झाली आहे त्याबद्दल काय लिहू ?
तरुण भारतचे संपादक मा.गो.वैद्य एका ठिकाणी लिहितात,
मरण मोठे भाग्य आहे त्याला घाबरू नये.योग्य वेळी त्याच्या स्वागतासाठी आपण सिद्ध असले पाहिजे.मरण म्हणजे एक विरह असतो हे खरे त्यामुळे आपल्या माणसाचा मृत्यू झाला तर वाईट वाटणे स्वाभाविक पण दु:ख बाजूला सारून जीवनाचा आनंद घ्यायला सिद्ध होणे हि आपली परंपरा आहे.मरणाची हि सुंदर कल्पना फक्त भारतीय संस्कृतीतच आहे.
---आमचे सोनारकाका

Wednesday, May 4, 2011

आयुष्यफारसुंदर आहे!..

yesएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो.
मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो
खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.
----क्रमशः;1