Sunday, April 24, 2011

साप्ताहिकी

मित्रहो,
गेल्या काही दिवसांपासून मी छोटासा लेखन प्रपंच करीत आहे त्यास प्रतिसादही चांगला आहे.गेल्या चार-पाच दिवसात आपले बालमित्र अवस्थी, संतोष सोमाणी ,सुनील झान्झरी, संजीव नान्दगावकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले.राजू जरा घाईत होता त्याच्या नवीन महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने बैठक बोलविली होती.नंतर सविस्तर बोलू असे म्हणत तब्बल दहा मिनिट तरी बोलला.संतोष तसा निवांत होता चहा पितो आहे, काय नवीन विशेष?असे विचारत संवाद सुरु केला !संजीवला फोन केला तेव्हा त्याने उत्तरच दिले नाही. कामात असेल नंतर बघू असा विचार करून मी फोन बंद केला तर आज सकाळी त्याचा फोन.छान गप्पा केल्या .चंदू देशमुखच्या तब्येतीबद्दल समजले काळजीचे कारण नाही.संजीवचा मुलगा बी ई अंतिम वर्षाला आहे एका चांगल्या संगणक कंपनीत नोकरी पण मिळाली आहे.कंपनीचे नाव कोग्निझांत[conignant ] त्याच्या सुयाशात आपण सहभागी होऊ या .आशोक हेडाच्या मुलीचे लग्न जून मध्ये आहे असे संतोष कडून समजले.आपण सर्व लग्नात भेटूयात!
--लेखनसीमा ---

ti

Sunday, April 17, 2011

फोटो परत एकदा !

मित्रांनो ,काही दिवसापूर्वी टीकाइत चा फोन आला होता फोटो पाहता येत नाही ! लक्ष्यात असे आले कि मराठी लिहिण्याची सोय करून घेतल्यामुळे हि अडचण निर्माण झाली आहे .त्यामुळे परत एकदा आठवतील तसे काही फोटो उपलोड करत आहे.
आपला ब्लोग बरेच जण वाचतात पण प्रतिक्रिया का देत नाहीत ? तुमच्या नोंदी महत्वाच्या आहेत. आपल्या मित्रांबद्दल काही नवीन समजले तर कळवत चला.


































yes

Saturday, April 9, 2011

काही विशेष

मित्रांनो,
चैत्र शुद्ध प्रतिपदा आर्थात ४/४/२०११ या दिवशी माझे उदर-भारानाचे साधन अर्थात दुकान नवीन जागेत सुरु झाले !तो दिवस काही छोट्या गोष्टीमुळे मला लक्ष्यात राहील असा ठरला !आतापर्यंत मी कधी समारंभात जाताना बुके घेऊन जात नसे !मला तो पैसा वाया घालवण्याचा प्रकार वाटे पण त्या दिवशी मला मिळालेल्या पुष्पगुच्चान्मुळे जाणवले कि हि किती सुंदर कल्पना आहे! 
   असो दुसरे असे कि आपला मित्र राजेंद्र अवस्थी रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात दिनांक ६ एप्रिल २०११ पासून प्राचार्यपदी रुजू झाला आहे सदर महाविद्यालय जय्क्रांती शिक्षण प्रसारक मंडळ ,लातूर या संस्थेचे आहे.याआधी तो जालना येथे ७ वर्ष बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात प्राचार्य होता.दिनांक ८ एप्रिल च्या दैनिक सामनात पान ७ वर बातमी आहे.
त्याचे  अभिनंदन !
मित्र प्रवीण कौन्धिन्या च्या मुलीचे लग्न दिनांक ३ जून ला आहे सासरा झाल्याबद्दल त्याचेही अभिनंदन !


Saturday, April 2, 2011

मानसी मेडिकल स्थलांतर सोहळा

मानसी मेडिकल स्थलांतर सोहळा. कार्यक्रमाची पत्रिका.